आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापात्रात बुडून दोन गणेशभक्तांचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - गणेश विसर्जनादरम्यान बुधवारी सायंकाळी कोपरगाव व राहाता येथे गोदावरी नदीपात्रात बुडून दोन भाविकांचा मृत्यू झाला. ओमप्रकाश राधेश्याम अग्रवाल (40, आदर्श चौक, कोपरगाव) व विलास काशिनाथ कदम (19, गोंडगाव, राहाता) अशी मृतांची नावे आहेत.

कोपरगाव येथील ओमप्रकाश सायंकाळी नदीपात्रात विसर्जनासाठी गेले होते. तेव्हा ते बेपत्ता झाले. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. रात्री नऊच्या सुमारास गोदापात्रात त्यांचा मृतदेह सापडला.

गोंडगाव येथील विलास कदम हे सायंकाळी 4 वाजता राहाता येथील गोदापात्रातील बंधार्‍यात विसर्जनासाठी गेले होते. पोहता येत नसल्याने ते बुडाले. अन्य भक्तांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यांचा मृतदेह रात्री उशिरा नदीपात्रात सापडला. या दोन्ही घटनांबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.