आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून युवती गर्भवती राहिली. दुसऱ्या युवकाने तिला बळजबरीने विषारी गोळ्या खाऊ घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद कोतवाली पोलिसांनी नोंदवून घेतली.
याप्रकरणी पोलिसांनी अभिनंदन वाळके (कोर्टगल्ली) देवेंद्र रभाजी वाळके (कवडे मळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, अभिनंदन वाळके याने बुरुडगाव रस्त्यावरील एका २४ वर्षांच्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर देवेंद्र वाळके याने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. नंतर अभिनंदनने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. देवेंद्रने १३ एप्रिलला नालेगाव येथे शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. नंतर ही युवती एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाली. युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार, फसवणूक, शिवीगाळ मारहाण करणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सदावर्ते करत आहेत.