आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जुलेहर्या मंदिरातील चोरी; दोन आरोपी गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पारनेर तालुक्यातील कर्जुलेहर्या येथील हरेश्वर मंदिरातील दानपेटी चोरणार्‍या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना रविवारी यश आल़े सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या धाग्यादोर्‍यांवरून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी आरोपींचा छडा लावला.

गणेश सतीश गव्हाणे (22, खडका फाटा, ता़ नेवासे) व गोकुळ ऊर्फ नरेश प्रभाकर शेळके (25 माका, ता़ नेवासे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवन राजेंद्र बिरसने ( खांडपिंपळगाव ता. फुलंब्री, जि़ औरंगाबाद) हा फरारी आहे. शुक्रवारी (20 सप्टेंबर) मध्यरात्री हरेश्वर मंदिरात तिसर्‍यांदा चोरी झाल्यानंतर निरीक्षक ढोकले यांनी तपासाची चक्रे फिरवली़

सीसीटीव्हीत मंदिरासमोर मध्यरात्री दोनच्या सुमारास ट्रक उभा राहिल्याचे दिसले ट्रकमधून दोघे उतरल़े मंदिराचा दरवाजा तोडून एकाने आत प्रवेश केला़ दानपेटी न फुटल्याने बाहेर पाळतीवर असलेल्या दुसर्‍या साथीदाराच्या मदतीने दानपेटी मंदिराबाहेर आणत ती ट्रकमध्ये टाकण्यात आली़ नंतर ट्रक कल्याणच्या दिशेने गेल्याचे फुटेजमध्ये दिसले. आरोपींनी 3 हजार 519 रुपये काढून दानपेटी आणेघाटात टाकली. ट्रक, तसेच चोरांची माहिती हाती आल्यानंतर निरीक्षक ढोकले यांनी कल्याण रोडवरील ढाबेचालकांकडे पांढरा पट्टा असलेल्या ट्रकची चौकशी केली. रानवारा हॉटेलच्या मालकाने ही ट्रक ओळखल्यानंतर मालकास फुटेज दाखवण्यात आल़े ही ट्रक ढाब्यावर थांबल्याची खात्री पटल्यानंतर तपासाला दिशा मिळाली़ चौकशीनंतर ती ट्रक अशोक गुंजाळ यांच्या मालकीची असून ते मुंबईत वास्तव्यास असल्याचे समजले. गुंजाळ यांनी ही ट्रक आपलीच असल्याचे, तसेच ती पैठणहून माल घेऊन पेण येथील इस्पात कंपनीत आल्याचे सांगितल़े पोलिसांनी इस्पात कंपनीतून दोन आरोपींना ताब्यात घेतले.