आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार शिक्षकांनी नाकारली पदोन्नती, 188 जागांवर पदवीधरांना मिळणार पदोन्नती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात विज्ञान पदवीधर पदोन्नतीसाठी उपलब्ध असलेल्या २०७ जागांसाठी हजार ४६१ शिक्षकांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी सुमारे हजार २७३ शिक्षकांनी पदोन्नती नाकारली अाहे. त्यामुळे १८८ जागांवरच पदोन्नती होऊ शकल्याने १९ जागा रिक्त राहिल्या आहेत.
 
जिल्हा परिषदेत मंगळवारी विज्ञान पदवीधर शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे हजार ४६१ शिक्षकांना या पदोन्नतीसाठी बोलावण्यात आले होते. पदोन्नतीसाठी २०७ जागांवर पदोन्नती देण्यासाठी विचारणा करण्यात आली. अवघ्या १८८ शिक्षकांनी पदोन्नत्या स्वीकारल्या. त्यामुळे १९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

तालुकानिहाय पदोन्नती : अकोले १७, कर्जत १, कोपरगाव ११, जामखेड ६, नगर २५, नेवासे १५, पाथर्डी १४, पारनेर १९, राहाता ८, राहुरी १३, शेवगाव १०, श्रीगोंदे १५, श्रीरामपूर ६, संगमनेर १६.
 
उपलब्ध जागांच्या तुलनेत रिक्त राहिलेल्या जागांची संख्या कमी दिसत असली, तरी शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी बोलावलेल्या हजार ४६१ शिक्षकांपैकी १८८ शिक्षकांनीच पदोन्नती स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.
बातम्या आणखी आहेत...