आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरी येथील शेततळ्यात बुडून दोन मजुरांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन ऊसतोडणी मजुरांचा बुडून मृत्यू झाला. अन्य दोघांना वाचवण्यात यश आले. ही दुर्घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे सोमवारी दुपारी एक वाजता घडली. सोमनाथ गोरक्ष लाटे (17) व राजू अण्णासाहेब लाटे (18, चिंचोली, ता. राहुरी) अशी मृतांची नावे आहेत.

तांभेरे येथील चंद्रकांत सखाहारी गागरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू आहे. सोमवारी दुपारी जेवणानंतर काही ऊसतोडणी मजूर शेततळ्यात आंघोळीसाठी उतरले. त्यातील चौघांना पोहता येत नसल्याने ते प्लास्टिक कागदाचा दोर करून शेततळ्यात उतरले होते. बुडू लागल्याने सोमनाथ लाटे व राजू लाटे यांनी एकमेकांना मिठी मारली. या दोघांचा मृत्यू झाला. नीलेश काळे व संभाजी लाटे यांनी आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूला असलेल्या मजुरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. योगेश आरगडे व विशाल आरगडे यांनी ठिबकच्या नळीच्या साहाय्याने नीलेश व संभाजीला पाण्याबाहेर काढले.

सोमनाथ व राजू लाटे यांचे मृतदेह गळाच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आले. हे दोघेही अविवाहित होते. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली.