आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Years Handicap Baby Girl To Sold To Parents At Newasa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 वर्षांच्या अपंग बालिकेस सोडून जोडपे पसार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासा: अपंग असलेल्या दोन वर्षांच्या बालिकेस सोडून अज्ञात जोडप्याने पलायन केले. ही घटना प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलजवळ रविवारी अज्ञात जोडपे बालिकेसह मोटारसायकलवर आले. या ठिकाणी त्यांनी काही वेळ घालवल्यानंतर दोन बालिकेस तेथेच सोडून जोडप्याने घाईघाईने औरंगाबादकडे पलायन केले. शाळेसमोरील सिद्धेश्वर केंद्रासमोर उभे असलेल्या विश्वनाथ सुडके व नामदेव यादव यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातीलच बाळासाहेब क्षीरसागर यांना याबाबत माहिती दिली.
क्षीरसागर व यादव यांनी मोटारसायकलवरून औरंगाबाद रस्त्यावर या जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विश्वनाथ सुडके यांचा मुलगा प्रताप सुडके यांनी मोटारसायकलवरून गंगापूर परिसरात जोडप्याचा शोध घेतला. मात्र, हे जोडपे पसार झाले होते.
घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक के. पी. कारखेले व पोलिस कॉन्स्टेबल हनुमंत गर्जे यांनी शाळेत जाऊन बालिकेस ताब्यात घेतले. या बालिकेचा रंग गोरा असून तिच्या अंगात लाल फ्रॉक, काळी पॅन्ट असून डोक्याला उपरणे बांधलेले होते. मानेजवळ ही बालिका अपंग आहे. सध्या तिला प्रवरासंगम पोलिस ठाण्यात ठेवले असून, तिच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक एम. डी. खेडकर यांनी केले आहे.