आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव यांच्या विनंतीमुळे शिर्डीत योगेश घोलपांची उमेदवारी मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशवजा विनंतीमुळे निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती आमदार बबन घोलप यांनी दिली. शिर्डीत सदाशिव लोखंडे, व घोलप यांचे पुत्र योगेश या दोघांच्या एबी फॉर्मसह दाखल उमेदवारी अर्जामुळे पेच निर्माण झाला होता.

आमदार घोलप यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालाने शिवसेनेने लोकसभेसाठी शिर्डीत उमेदवार बदलून माजी आमदार सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिली. यावर घोलपांनी त्यांचा एबी फॉर्म पुत्र योगेशला देऊन पक्षाचा व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. पक्षाचा अर्ज गुरुवारी मागे घेतल्यानंतर आता अपक्ष म्हणून भरलेला अर्ज शुक्रवारी मागे घेतला जाणार आहे.

आता मोकळा झालो : माझ्याविरुद्ध छगन भुजबळांनी माहिती पुरवल्याची कबुली याचिकाकर्त्यांनी दिली आहे. आता नाशिककरांना भुजबळांच्या संपत्तीची माहिती देण्यासाठी मोकळा झालो. आम्ही दोघेही भाजीपाला विकत होतो. त्यांची संपत्ती कशी वाढली हे जनतेला सांगणार आहे, असे घोलप म्हणाले.