आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Rally,latest News In Divya Marathi

उद्धव ठाकरे यांची आज श्रीगोंद्यात सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (7 ऑक्टोबर) श्रीगोंद्यात जाहीर सभा होणार आहे. पक्षप्रमुख झाल्यानंतर ते प्रथमच तालुक्यात येत आहेत. शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांच्या प्रचारासाठी सकाळी दहा वाजता येथील हेलीपॅड मैदानावर ही सभा होईल.
श्रीगोंद्यासह नगर शहर, पारनेर, कर्जत-जामखेड व राहुरी मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रचाराचे स्वरूप या सभेला आले आहे. त्यादृष्टीने शिवसेना कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मिती केली आहे. यापूर्वी बाळासाहेब विखे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे श्रीगोंद्यात आले होते. शिवसेनेचा मोठा नेता तालुक्यात येण्याची ही दुसरी वेळ आहे. या सभेचे चोख नियोजन शिवसेना नेत्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र वळवी, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब गोरे, श्रीगोंदे तालुका उपप्रमुख नंदू ताडे, शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, विद्यार्थी सेनेचे हरिभाऊ काळे आदी उपस्थित होते.