आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhav Thackeray And Gopinath Munde Meet At Ahmednagar

उद्धव ठाकरे, मुंडे यांची सभा; प्रताप ढाकणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांची प्रचारसभा नगरला होणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपचे निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांची बुधवारी आमदार राठोड यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीला पंच कमेटीचे सदस्य उपस्थित होते. शिवसेना-भाजप एकत्र प्रचार करणार असून, 11 डिसेंबरला ठाकरे व भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांची प्रचारसभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, स्मृती इराणी यांच्याही प्रचारसभा होणार आहेत, असे ढाकणे यांनी सांगितले.
सेनेला विश्वासात न घेता भाजपने प्रचाराचा नारळ फोडला, याबाबत विचारले असता ढाकणे म्हणाले, भाजपने प्रचार सुरू करण्यासाठी मुहूर्त काढला होता. त्याप्रमाणे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. झाले गेले गंगेला मिळाले. युती अभेद्य आहे. दोन्ही पक्षांची युती व्हावी, ही प्रामाणिक भावना होती, असेही ढाकणे यांनी सांगितले.