आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Udhav Thackreray Give Assurance To Marathwada For Solving Their Their Water Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवू, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आघाडी सरकारने सत्तर हजार कोटी खर्चूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. राज्यातील पाणी पेटले असून मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात भांडणे सुरू आहेत. ही भांडणे होऊ नयेत तसेच शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे शासन कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली.

शिर्डी निघोज येथील साईपालखी येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते की, काँग्रेसच्या ताब्यात देश राहिल्यास देशात अराजक माजेल. आज त्याची प्रचिती येत आहे. इशरत जहाँ निरपराध असल्याचा साक्षात्कार शरद पवारांना आता झाला, असे सांगताना सरकार तुमचे, गृहखाते तुमच्याकडे, मग हे असे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात युतीची सत्ता येणार असल्याची जाणीव झाल्याने सेना-भाजपचे मतदार यादीतून वगळण्याचे षड्यंत्र रचण्याचे कारस्थान आघाडीचे सरकार करेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार
सीमेवर पाकिस्तानी, चिनी, बांगलादेशीयांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भारतीय जवान मारले जात असताना राज्यकर्ते मात्र षंढासारखे बघत आहेत. आता नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे ठामपणे सांगून त्यांनी मोदी व युतीचा मुख्यमंत्री यांना साईबाबांच्या आशीर्वादासाठी घेऊन येणार असल्याची माहिती दिली.