आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांना कायदा अपंग वाटतोय, उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एकतर्फी प्रेमातून होणारे खून खटले अभ्यासताना, लढताना मी नेहमी गुन्हा का घडला याचा विचार करतो. तरुणीने तरुणाचे प्रेम स्वीकारले नाही, म्हणून तरुण तरुणीवर अॅसिड फेकतो. इथे आमच्या युवक-युवतींचे कुठेतरी चुकते आहे. कायदा त्यांना अपंग वाटायला लागला आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्था पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारंभ समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प अॅड. निकम यांनी ‘कायदा सुव्यवस्था आणि समाज’ या विषयावर गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक शांतीभाई चंदे उपस्थित होते. व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, मानद सचिव विकास पाथरकर, संचालक किरण बनकर, डॉ. ललिता देशपांडे, दीपा चंदे, नरेंद्र श्रोत्री, अनिल सबलोक उपस्थित होते. अॅड. निकम म्हणाले, कायदे बलवान, सुदृढ आहेत; पण त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा त्याचा गैरवापर वा दुरुपयोग करीत असेल, तर त्यात दुरुस्ती केली पाहिजे. एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला न्यायालय खूप वेळ लावते, असे सर्वसामान्यांना वाटते. पण त्यासाठीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे असते. राष्ट्रपतींकडे जर दयेचा अर्ज केला, तर त्यावर निर्णय द्यायला वेळ लागतो. न्यायालयात एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करताना गुन्ह्याचे स्वरूप काय, आरोपीचे वय, त्याने केलेले गुन्हे, अपवादात्मक अपवाद म्हणून ही मागणी का केली या बाबी सिद्ध कराव्या लागतात; विशेष सरकारी वकील म्हणून काम करत असताना प्रत्येक पक्षाला, प्रत्येक पुढाऱ्याचा मी त्याचा माणूस आहे, असे वाटते. माझे विचार स्वच्छ आहेत. पण मी फक्त कायद्याचा पुढारी आहे, असे अॅड. निकम यांनी सांगताच हाशा पिकला. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सदस्य कै.उमाकांत चांदेकर-गौरव पुरस्काराने संस्कृत संगीत तज्ञ डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ.शरद कोलते, सुरेश खामकर, जालिंदर बोरुडे, घनपाठी महेश रेखे गुरुजी, प्रमोद मुळे, संध्या कुलकर्णी यांना गौरवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...