आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेपर्डी खटला: सरकारकडून विलंब झाल्याचा आरोप चुकीचा, उज्ज्वल निकम यांचा श्रीरामपूर येथे दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- कोपर्डीप्रकरणी सरकारकडून मुद्दाम विलंब झाल्याचे चित्र उभे केले जात आहे. हे आरोप पूर्ण चुकीचे अाहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर साक्षी तपासण्यास प्रारंभ झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांत न्यायालयीन कामकाज पूर्ण करणारा हा राज्यातील पहिलाच खटला असल्याचा दावा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी केला.

श्रीरामपूर येथील न्यायालयात अॅड. निकम आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, १३ जुलै २०१६ रोजी म्हणजे वर्षभरापूर्वी कोपर्डीची दुर्दैवी घटना घडली.

आरोपींना अटक करून संपूर्ण तपास पूर्ण करून ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. १७ ऑक्टोबरला आरोपींवरील आरोप निश्चित करण्यात आले. २० डिसेंबरला पहिल्या साक्षीदाराची तपासणी झाली. २४ मे २०१७ पर्यंत सर्व अर्थात ३१ साक्षीदारांच्या उलट तपासण्या पूर्ण झाल्या. डिसेंबर २०१६ ते मे २०१७ दरम्यान अवघ्या पाच महिन्यांत इतक्या मोठ्या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले. आता केवळ युक्तिवाद निकाल या दोनच न्यायालयीन बाबी बाकी आहेत. जलदगती न्यायालयापेक्षाही जलदगतीने कामकाज पूर्ण होणारे महाराष्ट्रातील हे बहुदा पहिलेच प्रकरण असावे.
 
पोलिस यंत्रणेने तपास वेगात पूर्ण केला. आरोपींना अटक केली. सर्व साक्षी पुरावे जमा केले. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयातही आम्ही वेगाने कामकाज केले. मात्र, आरोपींच्या वतीनेच या प्रकरणात मोठ्या प्रमाणात दिरंगाई करण्यात आली. उलट तपासणीस जास्त वेळ लावला. आरोपी गैरहजर असणे या बाबींमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. घटनेस वर्ष पूर्ण होत असले, तरी न्यायालयाचे मुख्य कामकाज अवघे पाचच महिने चालले. त्यामुळे विलंबाचे उभे केले जात असलेले चित्र फसवे असून सरकारी पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप अॅड. निकम यांनी केला.
 
सनसनाटीसाठी खटाटोप
आरोपी पक्षाकडून मुख्यमंत्री, मंत्री, अॅड. निकम यांच्यासह सात जणांच्या साक्षी घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. विनाकारण निकालास विलंब लावण्यासाठी, तसेच प्रसिद्धीसाठी हा खटाटोप सुरू असल्याचे अॅड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 

पुढील स्‍लाइडवर... कोपर्डीतील निर्भयाला नगरमध्ये श्रद्धांजली
बातम्या आणखी आहेत...