आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरणगाव गटाची पोटनिवडणूक बिनविरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अरणगाव पोटनिवडणुकीत पूनम भिंगारदिवे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना आमदार शिवाजी कर्डिले. समवेत आमदार अरुण जगताप, सभापती संदेश कार्ले, प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय सदाफुले. छाया: सचिन शिंदे)
नगर - जिल्हा परिषद सदस्य शारदा भिंगारदिवे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची सून पूनम रोहिदास भिंगारदिवे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले.
जिल्हा परिषदेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अरणगाव गटातून शिवसेनेच्या शारदा भिंगारदिवे या तालुक्यात सर्वाधिक साडेपाच हजार मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या. त्यांनी विविध सभांमध्ये जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. यात्रेला गेल्या असता त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील निवडणुकीच्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. पोटनिवडणुकीसाठी ही जागा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अट्टहासाने काँग्रेसकडून मागून घेतली. या जागेसाठी रिना प्रकाश कांबळे वेणुबाई रामा उमाप यांनी अर्ज दाखल केले होते. ही जागा लढवायचीच असा चंग राष्ट्रवादीच्या एका गटाने बांधला होता. पण ही जागा बिनविरोध करून शारदा भिंगारदिवे यांना श्रद्धांजली वाहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. त्यास राष्ट्रवादीच्या एका गटाने सकारात्मक प्रतिसाद दिला, तर एक गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्याशी याबाबत चर्चा केली. जगताप यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित नेते, इच्छुक उमेदवारांना बाेलावून घेत त्यांची समजूत घातली. यावेळी गाडे, आमदार शिवाजी कर्डिले, सभापती संदेश कार्ले उपस्थित होते. आमदार जगताप यांनी प्रथमच नगर तालुक्यातील राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...