आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर कोटींच्या सावेडी भुयारी गटार योजनेस मंजुरी;महापौर शिंदे यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शंभर कोटी पन्नास लाख खर्चाच्या सावेडी येथील भुयारी गटार योजनेच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती महापौर शीला शिंदे यांनी मंगळवारी दिली.

सावेडी भागात नागरी वसाहतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात नवे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या भागात भुयारी गटार योजना असणे गरजेचे होते. त्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. भुयारी गटार योजनेबाबत मंगळवारी मंत्रालयातील नगरविकास विभागात बैठक झाली. आयुक्त विजय कुलकर्णी, अभियंता परिमल निकम यावेळी उपस्थित होते. सावेडी व केडगाव येथील भुयारी गटार योजनेच्या कामाला यावेळी मंजुरी देण्यात आली, असे महापौरांनी सांगितले.

या योजनांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सावेडी भुयारी गटार योजना 100 कोटी 50 लाख रुपये खर्चाची, तर केडगाव-सारसनगर योजना 82 कोटी 25 लाख रुपये खर्चाची आहे.