आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ममता'मधील मिठाई आरोग्यास घातक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - येथील मुख्य रस्त्यावरील ममता स्विट्समधून जप्त करण्यात आलेल्या मिठाईचा नमुना मनुष्य सेवनास धोकादायक असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळाला आहे. अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षददीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आता ममता स्विट्सच्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला जाणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी दिली.

श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिवाळीदरम्यान ममता स्विट्समधून विविध प्रकारची मिठाई खरेदी केली होती. मिठाईचे सेवन केल्यानंतर काही वेळातच त्यास उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी त्यास तत्काळ दवाखान्यात हलवले. याबाबत मोरे यांनी त्याच दिवशी नगर येथील अन्न औषधे प्रशासनाच्या कार्यालयात मिठाईच्या नमुन्यांसह तक्रार केली. मात्र, त्यांनी दिलेले नमुने नाकारून त्याच रात्री वाजता अन्न सुरक्षा अधिकारी पवार अन्न पदार्थ नमुना सुरक्षा अधिकारी बा. ग. साळकर यांच्या पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला. तेथून बुंदी लाडू, गोडीशेव, रव्याचे लाडू, मिल्क केक कलाकंद आदी मिठायांचे नमुने जप्त केले. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. महिनाभराने आता या नमुन्यांबाबतचा अहवाल आला आहे. त्यातील गोडीशेव ही मिठाई सेवनास धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार आता ममता स्विट्सच्या मालकाविरुद्ध अहवाल तयार करून आयुक्त डॉ. कांबळे यांना सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात याबाबत खटला दाखल केला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

अन्न औषधे प्रशासनाने केलेल्या छाप्यात ममता स्विटसच्या मालकाला दुकानाचा परवाना दाखवता आला नव्हता. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या जागेत पदार्थ बनवणे बंधनकारक असते. हा नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेला उघड्यावर पदार्थ बनवले जात असल्याची बाब छाप्यादरम्यान पथकाच्या निदर्शनास आली. या दोन्ही प्रकरणी त्याचवेळी नोटीस बजावण्यात आली होती. यातील परवान्यासाठी अर्ज करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बाहेर पदार्थ बनवण्याबाबत नोटीस बजावण्यात येऊनही ते बंद केल्याने याबाबत अन्न औषधे प्रशासनाने पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. यानंतरही बंद केल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. मुख्याधिकारी मोरे यांनी केलेल्या तक्रारीमुळे शहरातील दुकानांमध्ये खाद्य पदार्थ बनवताना काळजी घेतली जात नाही. हे मात्र अधोरेखित झाले आहे. शहरात सुमारे अर्धा शेकडा खाद्यपदार्थ बनवून विकणारी दुकाने, हॉटेल्स आहेत. अनेक ठिकाणी अशाच प्रकारे नियम धाब्यावर बसवून, अधिकाऱ्यांना ठेंगा दाखवून ग्राहकांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्याचे मनुष्याच्या जीवनावर तत्काळ परिणाम दिसत नसले, तरी दूरगामी परिणामांना बळी पडावे लागते.
दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
मनुष्यसेवनास धोकादायक पदार्थ बनवून विकणाऱ्याविरुद्ध अन्न, सुरक्षा मानके कायदा २००६ नियम नियमन, २०११ चे कलम ६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. पोलिसांकडे जाता अन्न औषधच्या अधिकाऱ्यांनाच याबाबत थेट न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे अधिकार आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल आधीच प्राप्त असतो. गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्यांपासून दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू
अन्न औषधे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याविषयी गांभीर्याने काम करते. मुख्याधिकारी मोरे यांच्या तक्रारीनंतर ममता स्विट्‌समधून जप्त करण्यात आलेल्या मिठाई सदोष असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. आता प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच खटलाही दाखल केला जाईल. आनंद पवार, अधिकारी अन्न सुरक्षा विभाग, नगर.