आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Sushilkumar Shinde Comment Issue

केंद्रीय गृहमंत्र्यांचे डोके ठिकाणावर नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारतीय जनता पक्ष व संघ परिवार अतिरेकी प्रशिक्षण कँप चालवून दहशतवादी तयार करत असल्याच्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचे पडसाद नगरमध्येही उमटले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी असे वक्तव्य करणार्‍या शिंदे यांचे डोके ठिकाणावर नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर खासदार दिलीप गांधी यांनी त्यांचे वक्तव्य निराधार असल्याचे म्हटले.

जयपूर येथील चिंतन शिबिरात 20 जानेवारीला शिंदे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. देशभरातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. जिल्हाभरातूनही शिंदे यांचा निषेध होत आहे.

शिंदे यांचा बोलविता धनी वेगळाच
संघ व भाजपने सांस्कृतिक चळवळीसोबत देशातील हिंदूचे प्रभावी संघटन करून विचारधारेच्या आधारावर मोलाचे योगदान दिले आहे. जनकल्याण व राष्ट्राच्या मजबुतीकरणात ही विचारधारा महत्वपूर्ण ठरली. राष्ट्रीयत्वाच्या या संस्कारामुळेच लाखो कार्यकर्त्यांनी राष्ट्रविकासाच्या कार्यात झोकून दिले. विधायक कार्याला वाहून घेतलेल्या संघ व भाजपवर शिंदे यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याने केलेले आरोप निषेधार्य आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा बोलविता धनी वेगळाच आहे.’’
- दिलीप गांधी, खासदार.

बंटी जहागीरदारमुळे वास्तव जनतेसमोर
युपीए सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री असे निराधार वक्तव्य करीत आहेत. त्यांचे डोके ठिकाणावर नाही. दहशतवादी कारवायांत काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षाचे लोकच अनेकदा आढळून आले आहेत. पुणे बाँबस्फोटप्रकरणी एटीएसने र्शीरामपूरमधून अटक केलेला बंटी जहागिरदार याचे उत्तम उदाहरण ठरावा. सुरुवातीला तो काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंड्याखाली वावरत होता. यातून दहशतवादाला खतपाणी घालणारे जनतेच्या निदर्शनास आले आहेत.’’
- राम शिंदे, जिल्हाध्यक्ष.

दहशतवाद्यांचे मनोधैर्य उंचावण्याची शक्यता
गृहमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने एका समाजाचा अनुनय करण्यासाठी केलेले हे वक्तव्य अत्यंत धोकादायक आहे. यातून दहशतवादी कारवाया करणार्‍यांचे मनोधैर्य उंचावण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात जाऊन भाजपची ताकद दाखवून देऊ.’’
- मिलिंद गंधे, शहराध्यक्ष.