आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Nitin Gadkari,latest News In Divya Marathi

आघाडीने शेतक-यांना कर्जाच्या खाईत लोटले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव- काळ्या आईची सेवा करणा-या शेतकऱ्यांची टोपी सोसायटीकडे, सदरा राष्ट्रीयकृत बँकेकडे, तर धोतर सावकाराकडे गहाण पडले आहे.
शेतकरी कर्जातच जन्मतो आणि तेथेच तो मरतो. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्याला वर्षानुवर्षे या खाईत लोटले आहे, असा आरोप करत शेतक-यांची ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे. त्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.
कोपरगावातील भाजप उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ पीपल्स बँकेलगतच्या मैदानावर आयोजित सभेत गडकरी बोलत होते. जीमंत्री शंकरराव कोल्हे, भाजपचे निरीक्षक व गुजरातचे खासदार वसंतभाई पटेल, प्रदेश मंत्री ई. सी. पटेल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, प्रदेश भाजपचे अ‍ॅड. रविकाका बोरावके, उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, विजय वहाडणे, दीपक गायकवाड, भरत मोरे, असलम शेख, सुरेखा राक्षे, बाळासाहेब गिधाड, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे, शहराध्यक्ष महावीर दगडे, टेकचंद खुबाणी, चेतन खुबाणी, मेहमूद सय्यद, संजीवनी कारखान्यांचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे व सर्व संचालक, महिला शिवसेना शहराध्यक्ष विमल पुंडे, "गणेश'चे संचालक धनंजय जाधव, निर्मला नरोडे, मंगल आढाव आदी या सभेस उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावयाचे आहे. पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी धावणाऱ्या पाण्याला चालायला लावलं पाहिजे, चालणारं पाणी थांबवलं पाहिजे आणि थांबलेलं पाणी जमिनीला पाजले पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त शेततळी बांधा. नाले रुंद व खोल करा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान ग्राम सडक योजनेप्रमाणे पंतप्रधान सिंचन योजनेचा प्रारूप आराखडा तयार केला आहे, असे त्यांनी सांगितले. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सध्या राजकारण म्हणजे सत्ताकारण बनले आहे. निष्क्रिय आमदारामुळे भेसूर झालेल्या कोपरगाव शहर व तालुक्याचा चेहरामोहरा मला बदलायचा आहे.

पंतप्रधान सिंचन योजना कार्यान्वित करू
नगर-नाशिकसह मराठवाड्याचा दिवसेंदिवस बिकट होत चाललेला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे काम केले जाईल. जिरायती भागाला वरदान असलेल्या निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी केंद्रातून जास्तीचा निधी देऊ. पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना कार्यािन्वत केली जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.