आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यावर जळत्या लाकडांचे मडके नेऊन घातले जाते देवीला साकडे, पहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - अक्षय्य तृतीयेनंतर महाराष्ट्रात ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर देवीच्या जत्रा भरत असतात. या जत्रा अनेक वर्षांपासून राज्याची संस्कृती जतन करण्याचे काम करत आहेत. अशीच एक जत्रा नगर जिल्ह्याच्या कोठेवाडी गावात देवीची जत्रा भरते. या जत्रेला विरोबाची जत्रा असेही म्हटले आहे. एका अनोख्या परंपरेमुळे ही जत्रा जगभरात प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण होतात, अशी या जत्रेची सर्वत्र ख्याती आहे.
जत्रेत आदिवासी एका विशिष्ट पद्धतीने देवीची आराधना करतात. यामध्ये भाविक डोक्यावरील मडक्यांमध्ये चंदनाची जळती लाकडे ठेवतात. हे मडके डोक्यावर घेऊन हे भाविक मंदिरापर्यंत जातात. या जळत्या लाकडांवर टाकण्यात आलेले तेल अनेकदा गरम होऊन भाविकांच्या डोक्यावरून खाली येत असते. पण श्रद्धा म्हणा किंवा अन्य काही भाविक कशाचीही पर्वा न करता गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळत आले आहेत.
रात्री उशीरापर्यंत चालणा-या या पुजेमध्ये प्रामुख्याने शेतीला भरभराट मिळावी आणि मानवाचे कल्याण व्हावे यासाठी देवाला साकडे घातले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. या जत्रेत सहभाग होण्यासाठी मुंबई, पुण्याचसह देशभरातून मोठ्याप्रमाणावर भावीक येत असतात.

पुढच्या स्लाईड्समध्ये पहा यासंबंधीचे आणखी काही फोटो...