आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Representatives Election On August 10

विद्यापीठ प्रतिनिधींची १० ऑगस्टला निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरजिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया संपली असून, विद्यार्थ्यांना विद्यापीठांर्तगत विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी होणाऱ्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांची निवडणूक प्रक्रिया १० ऑगस्टला होत असून, त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

विद्यार्थी संघटना विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयीन निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. बऱ्याच वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने सर्वांनाच त्याविषयी आैत्सुक्य आहे. १९९४ च्या कायद्यानुसार ही निवडणूक होणार आहे. विविध शाखांतील गुणवत्ताधारक, क्रीडा, सांस्कृतिक, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, प्राचार्यांनी निवड केलेल्या दोन प्रतिनिधींना या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल.

नगर जिल्ह्यातील एकूण १२२ महाविद्यालयांमधून १२२ विद्यापीठ प्रतिनिधींची निवड होणार आहे. सर्व राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनांनी आपला प्रतिनिधी निवडला जावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारात निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे.

शासनाचा निर्णय बंधनकारक
विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक १९९४ च्या नियमानुसार १० आॅगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने घोषित केले आहे. राज्य सरकारने निवडणुकीसंबंधी काही निर्णय घेतला, तर तो सर्व महाविद्यालयांसाठी तो बंधनकारक राहील.'' प्रा.बी. व्ही. नागवडे, संचालक, उपकेंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नगर.