आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseasonal Rain News In Marathi, Nagar, Divya Marathi

श्रीगोंदे, जामखेडमध्ये मुसळधार पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील श्रीगोंदे व जामखेड तालुक्यातील काही भागांत बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने श्रीगोंदे परिसरात काढून ठेवलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीगोंदे परिसरात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली.
विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अचानक सुरू झालेल्या पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. जामखेड तालुक्यातील जिक्री, पाडळी, धोंडपारगाव या गावांसह परिसरात बुधवारी दुपारी तीन वाजता सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. या पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. दरम्यान, सकाळी जामखेड परिसरात सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.