आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने लावली हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले/कर्जत - अकोले,कर्जत तालुक्यांसह नगर शहरात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात सायंकाळी अर्धा तास पाऊस झाला. अकोले तालुक्यातील कळस, सुगाव, कुंभेफळ, वाशेरे, नवलेवाडी, धुमाळवाडी या भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत झाली. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाने झोडपून काढले. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर भाजीपाल्याच्या उभ्या पिकांचे या पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या पावसाने सोबत गारा आणल्या नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान टळले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. नुकसानीची माहिती मात्र समजू शकली नाही. अर्धा तास झालेल्या या पावसाने शेतीसाठी कोणताही फायदा होणार नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात चांगलाच उकाडा होता. मिरजगाव परिसरात झालेल्या या पावसाने उकाडा कमी झाला. येथील नागरिकांनी महिलांनी वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या छतावरील पावसाचे पाणी भरण्याची धडपड केली. पुढील दोन तीन दिवसांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. नगर शहरातही पावसाचा शिडकावा झाला.