आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपाइं लोकसभेच्या तेरा जागा लढवणार; राजेंद्र गवई यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइं राज्यात 13 जागा लढवणार आहे. आपण स्वत: अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातही रिपाइं उमेदवार उभे करणार आहे, असे या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत डॉ. गवई म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीजण आपल्याला अमरावतीतून घड्याळाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करत आहेत. तथापि, आपण रिपाइंकडूनच निवडणूक लढवणार आहोत. घड्याळाचा आग्रह करणे म्हणजे एक प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यासारखे आहे. आमची चिंता करू नका, आम्हाला पडण्याची सवय आहे. पंतप्रधानपद दिले, तरी आपण रिपाइं सोडणार नाही, असे ते म्हणाले.

चार वर्षांपूर्वी अमरावती लोकसभा मतदारसंघात आपल्याला 2 लाख 552 मते मिळाली होती. त्यावेळी मित्रपक्षांनी पुरेशी मदत न दिल्याने आपला पराभव झाला. यंदाच्या निवडणुकीत किमान 3 लाख मते मिळतील. भाजप किंवा अन्य पक्षामंध्ये आपण जाणार नाही. गेल्या निवडणुकीत झालेल्या चुका आपल्याला कळल्या असून, त्या आपण दुरुस्त करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.