आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर ‘आप’चा ज्वर, दमानिया आज अण्णा हजारे यांच्या भेटीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा असल्याची चर्चा असतानाच दिल्लीतील निवडणुकीतही ही हवा चालणार की, आम आदमी पक्षाचा झाडू याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मंगळवारी सकाळपासूनच मतमोजणीचे अपडेट व्हाॅट्स अॅपसह इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर सुरू होते. विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर "आप'चा ज्वर अधिकच वाढत गेला. त्याबरोबरच दिल्लीतील पराभव मोदींच्या माथ्यावर मारण्याची संधीही सोशल नेटवर्कने सोडली नाही.
या निवडणुकीपूर्वी देशभरात मोदी लाट असल्याने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत भाजपने सत्ता स्थापन केली. मोदींची हवा दिल्लीतही चालणार का, असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात होता. तथापि, दिल्लीतील जनादेश "आप'च्या बाजूने गेल्यानंतर ही हवा आता राहिली नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल साईट्सवर उमटल्या. अभिनेते अनिल कपूर यांच्या नायक चित्रपटातील घटनांना उजाळा देत दिल्लीतील "आप'च्या विजयाचा घटनाक्रम नायक चित्रपटाशी जोडण्याचा प्रयत्न काही हौशी मंडळींनी व्हाॅट्स अॅपवर केला. दिवसभर निवडणुकीच्या निकालाचे अपडेट व्हाॅट्स अॅपसह इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर मिळत होते. आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक किरण उपकारे "दिव्य मराठी'शी बोलताना म्हणाले, हा नरेंद्र मोदींच्या नऊ महिन्यांतील कारकिर्दीचा पराभव आहे. जमीन अधिग्रहणासारख्या कायद्याविरोधात जनतेने ही प्रतिक्रिया दिली. आम आदमी पक्षाच्या नगर येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढेवाटप करून जल्लोष केला. भाजपच्या गोटात मात्र शांतता होती.

दमानिया आज अण्णा हजारे यांच्या भेटीला
दिल्लीतील विजयानंतर मुंबईत सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी एकत्र जमून जल्लोष केला. पक्षाच्या अंजली दमानिया बुधवारी सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी येणार आहेत.'' किरण उपकारे, जिल्हा समन्वयक.