आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग वंचितांच्या कल्याणासाठी करा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आज अनेक युवक चंगळवादाचे बळी ठरत आहेत. त्याचे मुख्य कारण नव्या तंत्रज्ञानाचा अनिर्बंध वापर. वास्तवकि नवीन तंत्रज्ञानाचा वापर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या कल्याणासाठी करायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रेमानंद रूपवते यांनी केले.

स्नेहालय संस्थेत आयोजित १४ व्या युवा प्रेरणा शिबिराच्या समारोपप्रसंगी रूपवते बोलत होते. ज्येष्ठ सामाजकि कार्यकर्ते पोपटराव पवार, संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, सचवि राजीव गुजर आदी यावेळी उपस्थित होते. रूपवते यांनी आपल्या भाषणात जातीपातीच्या आधारावर समाजप्रबोधन न करण्याचे आवाहन केले. सर्वधर्मसमभावाच्या आधारावर युवकांनी समाजातील संवेदनशील घटकांना समाज प्रबोधनात्मक उपक्रमांत सहभागी करून घ्यावे, असे ते म्हणाले.

पवार यांनी जलसंधारणाबाबत माहिती देताना गावातील समस्यांबाबत ऊहापोह केला. पाणी वापरा, पाणी वाचवा मोहिमेसाठी युवकांनी गावोगावी जाऊन लोकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. गावे समृद्ध करण्यासाठी शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. तथापि, त्यांची माहिती ग्रामस्थांना नसते. युवकांनी या योजना त्यांना समजावून सांगाव्यात. गाव हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करावा, असेही ते म्हणाले.

प्रास्तावकिात गुगळे यांनी युवा प्रेरणा शिबिराविषयी सांगितले. समाजातील ज्वलंत प्रश्न व समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्नेहालय संस्था दरवर्षी युवा प्रेरणा शिबिर आयोजित करते, असे ते म्हणाले. शिबिरात सहभागी झालेल्या गटांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्यांना यावेळी पारितोषकिे देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल गावडे यांनी केले. आभार गुजर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल अहिरे, मोबीन सय्यद, वकिास सुतार, आकाश रेडे, संकेत होके, गणेश शेंगडे, बाळू इंगळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - स्नेहालय संस्थेत आयोजित १४ व्या युवा प्रेरणा शिबिराच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या या गटांचा पारितोषकि देऊन सन्मान करण्यात आला. समवेत प्रेमानंद रूपवते व पोपटराव पवार.