आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर । तायक्वांदो खेळात भारतात राष्ट्रीय स्तरावर काम करणारी लखनौ येथील तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था एकमेव अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (बंगलोर) या नावाने निवृत्त आय. पी. एस. अधिकारी हरिषकुमार हे अनधिकृत समांतर संघटना चालवत असून कोर्टाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हे नाव वापरण्यास बंदी केली आहे. त्यांच्याद्वारे चालवल्या जाणार्या इतर तायक्वांदो राज्य संघटना, पदाधिकारी, प्रशिक्षक यांनी कुठल्याही प्रकारे तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया ही नावे वापरल्यास, खेळाडूंना ओळखपत्र दिल्यास किंवा स्पर्धा घेतल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दादा वाखारे यांनी दिला.
वाखारे म्हणाले, महाराष्ट्रात तायक्वांदो स्पोर्टस् असो. ऑफ महाराष्ट्र ही राज्य संघटना जगतियानी यांच्या तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असणारी संघटना आहे. अध्यक्ष दादा वाखारे (पुणे) सचिव सुनील सावंत (मुंबई), तर उपाध्यक्ष घनश्याम सानप (अहमदनगर) आहेत. परंतु बंगलोर यांच्याशी संलग्न असणारी व नांदेड खेळाडू धिंड प्रकरण, शिष्यवृत्ती घोटाळे, पदाधिकार्यातील हाणामार्या याने गाजत असलेली तायक्वांदो असो. ऑफ महाराष्ट्र व त्याचे पदाधिकारी विनायक गायकवाड व भास्कर करकेरा हे अनधिकृतपणे तायक्वांदो संघटना चालवत असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.