आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राळेगण देशात आदर्श; माजी लष्करप्रमुख सिंह यांनी घेतली अण्णांची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगणसिद्धी- माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धीला भेट दिली. येथील विकास पाहून आपण भारावून गेलो. राळेगणसिद्धीप्रमाणेच सर्व गावांचा विकास झाला, तर भारताची प्रगती होईल, असे ते म्हणाले.
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान सिंह यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या हातून सरबत घेऊन अण्णांनी उपोषण सोडले होते. दुपारी 1 वाजता सिंह यांचे आगमन झाले. हजारे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हा पोलिसप्रमुख आर. डी. शिंदे, सहायक अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, संतोष भारती आदी उपस्थित होते. सिंह यांनी निळोबाराय विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यापूर्वीचे राळेगणसिद्धी व आजचे राळेगणसिद्धी यातील फरक त्यांनी हजारे यांच्याकडून समजावून घेतला. आपला दौरा केवळ राळेगणसिद्धी पाहण्यासाठीच होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीचा आंदोलनाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा व्ही. के. सिंह यांनी केला.