आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांच्या साफसफाईसाठी व्हॅक्यूम यंत्राची चाचणी; महापौर, अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी व्हॅक्यूम यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. बालिकाश्रम रस्ता, नीलक्रांती चौक आदी ठिकाणी गुरूवारी दुपारी या यंत्राची चाचणी घेण्यात आली. महापौर सुरेखा कदम, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी यंत्राद्वारे करण्यात येणाऱ्या साफसफाईची पाहणी केली. यंत्रे खरेदी करण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. 

हे यंत्र रस्त्यावरील धूळ माती हवेच्या प्रेशरने गोळा करते. महापौर कदम, अतिरिक्त आयुक्त वालगुडे आदींच्या उपस्थितीत या यंत्राची चाचणी घेण्यात आली. यंत्रे खरेदी करायची की नाही, िकती यंत्रे खरेदी करायची याबाबतचा निर्णय स्थायीच्या सभेत होणार होईल. यानिमित्ताने महापालिकेचा घनकचरा विभाग हायटेक होण्यास मदत होणार आहे. 

शहरातील सध्याची कचरा संकलन व्यवस्था पूर्णपणे काेलमडली आहे. घंटागाडी येत नसल्याने नागरिक जागा मिळेल तेथे कचरा टाकतात. महापालिकेचे सफाई कामगार रस्त्यांची साफसफाई करतात, परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हे काम नियमित होत नाही. त्यामुळे व्हॅक्यूम यंत्रांची खरेदी झाली, तर रस्त्यांच्या साफसफाईचा प्रश्न सुटेल. यंत्राद्वारे करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल प्रशासनाकडून स्थायीसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच यंत्रांची खरेदी होणार की नाही, याबाबतचा निर्णय होईल. नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रस्त्यावर साफसफाईची चाचणी घेताना हे नवे व्हॅक्यूम यंत्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

यंत्राने कचरा उचलला नाही... 
चाचणीघेताना हे यंत्र रस्त्यावरील धूळ माती हवेच्या प्रेशरने आेढून घेत होते, परंतु रस्त्यावर पडलेला कचरा, प्लास्टिक, कागद असा कचरा यंत्राद्वारे उचलला जात नव्हता. यंत्राद्वारे एका वेळी सुमारे एक मीटर अंतरावरीलच धूळ, माती उचलली जात होती. त्यामुळे ही यंत्रे खरेदी करताना महापालिकेला विचार करावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...