आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांच्या संशोधनातूनच देशाची प्रगती, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आज आपल्या देशापुढे अनेक आव्हाने आहेत. मात्र, तरीही आपण युवकांच्या संशोधनाच्या माध्यमातून देशाला प्रगतिपथावर घेऊन जाऊ शकतो, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.

लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाने आयोजित केलेल्या तीन दविसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण होते. या वेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, सिनेट सदस्य अ‍ॅड. आप्पासाहेब दिघे, सहसचवि, डॉ. जे. आर. भोर, डॉ. पी. जी. रेड्डी उपस्थित होते.
डॉ. गाडे म्हणाले, आपला देश आजही ऊर्जा, अन्नधान्य, माहिती तंत्रज्ञान याबाबतीत समाधानकारक प्रगती करू शकलेला नाही. या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांच्या सहभागातून असे दिसते की, आपण नशि्चितच जागतिक पातळीवर संशोधनाच्या माध्यमातून प्रगतिपथावर जाऊ शकतो. मूलभूत विज्ञानातील पायाभूत संशोधनाशविषय देशाचा विकास अशक्य आहे.

जर्मनीतील संशोधक डॉ. कार्लोस मचाडो म्हणाले, या परिषदेतून जागतिक पातळीवरील संशोधकांच्या संशोधनाला चालना मिळते. तसेच एकमेकांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करून जागतिक दर्जाचे संशोधन सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते. या परिषदेत विविध देशांतील संशोधक व अभ्यासक सहभागी झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी त्यांचे आभार मानले.