आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांबोरी ग्रामपंचायतीचे राजकारण तापू लागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वांबोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर गावातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी पाटील गटाने बेरजेचे राजकारण करत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न चालवले आहेत, तर विरोधी गटाकडून गुप्त बैठकांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी तनपुरे गटाचे कार्यकर्ते पक्षीय बैठकीनंतर आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारण तापले असून नेते गावातील प्रत्येक घडामोडींवर बाराकाईने लक्ष ठेवून आहेत.

मागील निवडणुकीच्यावेळी जनसेवा मंडळाचे माजी सरपंच नितीन बाफना सुरेश बाफना यांनी समीकरणे बदलण्याचा निर्णय घेतला. त्याला माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी संमती दिल्याने तनपुरे पाटील गटाची युती झाली होती. त्यावेळी वांबोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तनपुरे पाटील यांच्या युतीने सर्व १७ जागा जिंकून जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या मंडळाचे पानिपत केले होते. सत्तेत आल्यानंतर सरपंच उदयसिंह पाटील यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात गाळे टपऱ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. पण सध्या तनपुरे गट बाजूला पडून स्वतंत्र पॅनल तयार करणार, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान पाटील गटाने बेरजेचे राजकारण करून विरोधी गटालाच सुरुंग लावत कृष्णा पटारे यांना बरोबर घेतले. त्यामुळे प्रभाग दोनमध्ये पाटील गटाला विरोधक नसल्याची चर्चा सुरू झाली. पण खळवाडी परिसरातील असंतुष्ट तरुणांचा एक गट प्रभाग दोनमधून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. दोन दिवसांपूर्वी सुरेश बाफना यांनी निवडणूक बिनविरोध करणार असल्याचे प्रसार माध्यमातून जाहीर केले. पण नितीन बाफना यांनी याचा इन्कार केल्याने निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
कृष्णा पटारे पाटलांच्या गटात गेल्याने फरक पडत नाही
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब भिटे, नितीन बाफना यांच्यासह आमची जुनी टीम सक्रिय आहे. कृष्णा पटारे हे पाटील गटात गेले असले, तरी आम्हाला कोणताही फरक पडणार नाही. उलट प्रभाग दोनमध्ये आमच्या पॅनलकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप होणार नाही.'' किसनजवरे, माजी सरपंच.

बिनविरोधचे आवाहन
निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. त्यासाठी आम्ही सर्वांशी संपर्क केला आहे. तशी चर्चाही झाली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन यापूर्वीच आम्ही केले आहे.'' उदयसिंहपाटील, सरपंच.

अजून निर्णय नाही
बिनविरोधचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. बैठक बोलवून तनपुरे जो निर्णय देतील तो मान्य करू. किसन जवरे, संभा मोरे, गोरक्षनाथ वेताळ, रंगनाथ गवते, श्यामराव पटारे, उत्तम पटारे आमच्या बरोबर आहेत.'' नितीनबाफना, माजी सरपंच.