आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूरवाडीचा तलाव विविध प्रकारच्या पक्ष्यांनी लागला गजबजू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छाया: कल्पक हतवळणे.)
विविध प्रकारचे पक्षी कापूरवाडी तलावाच्या परिसरात दिसू लागले आहेत. लष्कराच्या वतीने या उन्हाळ्यात गाळ काढण्यात आल्याने या ऐतिहासिक तलावाला संजीवनी मिळाली आहे. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे या तलावात चांगला साठा झाला आहे. निजामशाहीत तयार करण्यात आलेल्या या तलावाचे मजबुतीकरण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी केले. अनेक दशके या तलावातून भिंगार परिसर लष्करी आस्थापनांना होत होता. मध्यंतरी तलावाजवळील काही धनाढ्य शेतकऱ्यांनी जॅकवेलमधील व्हॉल्व्ह बंद केल्याने हा पाणीपुरवठा थांबला होता. लष्कराने काही आठवडे काम करून तलावातील गाळ काढला. या तलावातील पाण्याचा उपयोग नगर शहरातील भूजल पातळी वाढण्यासाठीही होणार आहे.