आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदबिबी महालाला वारली चित्रशैलीचं कोंदण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वारलीही आदिवासींची अभिजात चित्रशैली. ती आत्मसात करून तिचा उपयोग नगरचं वास्तुवैभव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम भिंगार येथील कॅन्टोन्मेंट शाळेतील हरहुन्नरी कलाशिक्षक अरविंद कुडिया यांनी हाती घेतला आहे.

नगरचा इतिहास, येथील लोककलेची परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने अरविंद मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत. भिंगार येथील आपल्या शाळेतील मुलांना त्यांनी या उन्हाळ्याच्या सुटीत वारली चित्रकला शिकवली. या दहा मुलांना घेऊन कुडिया यांनी भिंगारमधील जॉगिंग पार्कची शंभर फूट लांबीची भिंत वारली चित्रांनी सजवली. कॅन्टोन्मेंट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांचे संकल्पनेतून साकारलेल्या या कलाकृतीचे अनेकांनी कौतुक केले.

अरविंद यांनी वारली शैलीचा वापर करून नगर परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रे रेखाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नुकतीच त्यांनी नगरची ओळख बनलेल्या चांदबिबी महालाची (सलाबतखान मकबरा) चित्रे रेखाटली. झाडाच्या पानांची किनार असलेल्या एका चित्रात सूर्य, तर दुस चित्रात चंद्र आणि तारे आहेत. डोंगरावर कुरणात चरणारी हरणं, पाणी वाहून नेणारा पानाडी, उखळात धान्य कांडणारी महिला असं दृश्य एका चित्रात, तर दुस चित्रात तारफा ढोल घेऊन महालाभोवती नाचणारे आदिवासी, शेतात नांगरट करणारे शेतकरी असं दृश्य दाखवण्यात आलं आहे.

नगरची आठवण
नगरच्या स्थापनेला ५२५ वर्षे झाली. हे औचित्य साधून नगरचा पर्यटनविकास करता येऊ शकेल. नगरच्या मातीशी, संस्कृतीशी नातं सांगणारी एखादी कलाकृती प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात असायला हवी. पाहुण्यांना भेट म्हणूनही अशी कलाकृती देणं नक्कीच आनंददायक ठरेल.'' अरविंदकुडिया, कलाशिक्षक, भिंगार.न
बातम्या आणखी आहेत...