आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vasundhara Mahotsav At Ahmednagar Four Thousand Plants

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसुंधरा महोत्सवांतर्गत चार हजार रोपांची लागवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेच्या वसुंधरा महोत्सवास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वृक्षलागवडीचे उद्दिष्ट महोत्सव संपण्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. महोत्सवांतर्गत आतापर्यंत शहरात सुमारे 4 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून निम्म्यापेक्षा अधिक वृक्ष नागरिकांनी संगोपनासाठी दत्तक घेतले आहेत. उर्वरित तीन हजार वृक्षांची लागवड येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे.
मनपा वृक्ष प्राधिकरण समिती व हरियाली यांच्या संयुक्त विद्यमाने 9 जुलैपासून वसुंधरा महोत्सवाला प्रारंभ झाला. येत्या 11 ऑगस्टपर्यंत 4 हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी शहरात 21 ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष लागवडीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनपाने शहरात 20 हजार माहितीपत्रके व दीड हजार भित्तीपत्रकांचे वाटप केले. त्यामुळे महोत्सवाला मोठय़ा प्रमाणात लोकसहभाग मिळाला.
विविध पक्ष, तसेच संघटनांचे कार्यकर्ते, राष्ट्रीय हरित सेना, एनसीसी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना व विद्यार्थ्यांनी महोत्सवात सक्रिय सहभाग घेतला. ठरवलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट महोत्सव संपण्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. नागरिकांनी वृक्ष लागवडीची मागणी केल्याने महोत्सव संपल्यानंतरही वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. महोत्सवासाठी काही वृक्ष पुण्याहून, तर काही सामाजिक वनीकरण विभागाकडून घेण्यात आले आहेत.