आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँडलाइनवरून व्हीसी, भरता येईल प्रीपेड बिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांसाठी ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्क (एनजीएन) ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सिस्टिम सुरू केली आहे. नगर शहरात वर्षभरात ही सुविधा सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या सेवेमुळे लँडलाइनवरून ग्राहकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मोबाइलप्रमाणे प्रीपेड बिल भरणे आदी सुविधा मिळू शकेल.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लँडलाइनवरून एकाच वेळी ३० जणांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता येणार आहे. मात्र, संवाद साधणा-या ग्राहकाकडेही "एनजीएन' सुविधा असणे आवश्यक आहे. ब्रॉडबँडशिवाय लँडलाइनवरून इंटरनेट, एसएमएसची सुविधा मिळू शकेल. मोबाइलप्रमाणे प्रीपेड बिल भरणे आणि एसएमएस पाठवणे या सेवाही उपलब्ध होणार आहेत. या सुविधेमुळे डिजिटल इंिडया हा कार्यक्रम यशस्वी होईल. "एनजीएन' साठी देशभरात कोअर एक्स्चेंज तयार करण्यात आले आहेत. १३६ विभाग "एनजीएन' स्वीचने जोडले जाणार आहेत.
शहरात सध्या "बीएसएनएल‘चे सुमारे ६३ हजारांवर लँडलाइन ग्राहक आहेत. या तंत्रज्ञानामुळे लँडलाइन ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरवणे सहजसोपे होणार आहे. तसेच, दूरभाषा क्षेत्र त्यातून अधिक सक्षम करता येणार आहे.

आजच्या मोबाइलच्या जमान्यात लँडलाइन ग्राहकांमध्ये होणारी घट लक्षात घेऊनच ही प्रणाली विकसित केल्याचेही "बीएसएनएल'च्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय "स्पीड पे' नावाच्या या नव्या सेवेद्वारे ग्राहकाचे बँक खाते नसतानाही ते मोबाइल रिचार्ज करू शकतील. मोबाइल वॉलेटमधील पैसे कोणत्याही बँकेच्या खात्यात हस्तांतरित करता येतील. बीएसएनएलच्या आउटलेटमधूनही हे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. "मोबाइल वॉलेट‘शिवाय बीएसएनएल बझ (सेल ब्रॉडकॉस्ट बेस्ड सेवा) नावाचे मनोरंजनाची सुविधाही बीएसएनएलने सुरू केली आहे. त्याद्वारे ग्राहकांना स्मार्टफोनद्वारे टीव्हीवरील मनोरंजन कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.

६३७४६ -लँडलाइन कनेक्शन
२०२४५ -ब्रॉडबँड कनेक्शन
२०४५७३ -मोबाइल प्रीपेड कनेक्शन

सक्षम समाजाची निर्मिती
डिजिटलइंडियाचे ब्रीद वाक्य "डिजीटल सक्षम समाजाची निर्मिती ज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे' हे आहे. या योजनेनुसार एक छत्राखाली भारतीय प्रशासनातील सर्व विभाग एकत्रित करणे, नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सर्व सेवा एका ठिकाणी सक्षमपणे, पारदर्शक, विश्वसनीय अल्प खर्चात उपलब्ध करणे यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक विभागाकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे.

जुने एक्स्चेंज बदलवणार
एनजीएनया सिस्टिमसाठी जिल्ह्यातील सर्व जुने एक्स्चेंज बदलवण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील एक्स्चेंजसाठी ओसीबी, ई-१० बी, आरएएक्स, तर ग्रामीण भागातील एक्स्चेंजसाठी सी-डॉट हे फ्रान्स, चीन, जपानचे तंत्रज्ञान असलेली यंत्रणा होती. आता बदलवण्यात येणार आहे.

पाठपुरावा गरजेचा
हीसुविधा लवकरात सुरू व्हावी यासाठी दूरसंचार सल्लागार अध्यक्ष खासदार दिलीप गांधी सदस्य खासदार सदाशिव लोखंडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे गरजेचे आहे. तरच जिल्ह्याला माहिती तंत्रज्ञानाचा फायदा मिळू शकेल. डिजीटल इंडिया हे फक्त बीएसएनएल साठीच मर्यादित नाही. जिल्हाधिकारी, आरोग्य, शिक्षण, पोलिस या सर्व यंत्रणा या सुविधेंतर्गत जोडल्या जाणार आहेत.

२९७ -दूरध्वनी केंद्र
३५९ -मोबाइल बीटीएस टुजी
७८ -मोबाइल बीटीएस थ्रीजी
बातम्या आणखी आहेत...