आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावरान लसूण 160, लवंगी 80 रुपये किलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाण्याच्या टंचाईमुळे भाजीपाल्याची घटलेली लागवड, लांबलेला परतीचा पाऊस, कमी पाण्यामुळे घसरलेले उत्पादन, बाजारपेठेत वाढलेल्या मागणीच्या तुलनेत घटणारी आवक आदी कारणांमुळे भाजीपाल्यांचे भाव पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ही स्थिती येत्या हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरू होईपर्यंत राहील.

यंदा पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावली, तरी परतीचा पाऊस मात्र लांबला आहे. नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात, तर सुरुवातीचा पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे अजूनही काही भागातील विंधनविहिरी व विहिरींच्या पाण्याने तळ गाठलेला आहे. त्यातच उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे सिंचनाच्या विविध पद्धतींचा वापर करून शेतकर्‍यांनी कमी पाण्यात पिके घेतली. परंतु काही भागात, तर पिके जगवण्याइतपतही पाणी शिल्लक राहिलेले नाही.

परतीचा मान्सून सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याची लागवड होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत किमती कमी होण्याची शक्यता नसल्याचे मत बाजार समितीतील विक्रेत्यांनी व्यक्त केले. रमजान व श्रावणाचे उपवास संपल्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात मालाची आवक मात्र पुरेशी होत नाही. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. गावरान लसूण 140 रुपये किलो आहे. हायब्रीड लसूण मात्र स्वस्त झाला आहे. शेपू व कोथिंबिरीची जुडी दोन रुपयांनी महागली आहे. वाल व गवारची भाजीही महागली आहे. दररोजच्या आहारात लागणारी मिरची, कांदा व लसूण महागल्यामुळे गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.