आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्‍या आल्‍या नगरकरांच्‍या आवाक्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खरीप हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे नगरच्या बाजारपेठेत ताज्या पालेभाज्या व फळभाज्यांची आवक वाढली आहे. ही आवक वाढल्यामुळे फळभाज्या व पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे पालेभाज्यांच्या वाढत्या दरांनी जेरीस आणलेल्या या उतरलेल्या दरांमुळे भाज्या नगरकरांच्या आवाक्यात आल्या आहेत. पण, चार ते पाच दिवसांपासून आवक मंदावल्यामुळे घेवडा आणि वालाच्या शेंगा महागल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात 120 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचलेले लिंबाचे भाव आता मात्र 48 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पिकांचे चांगले उत्पादन झाले. त्यामुळे बाजारपेठेत ताजा भाजीपाला यायला सुरुवात झाली. नगरच्या बाजारपेठेत नगर तालुक्यातील बहुतांश गावांमधून ताज्या भाजीपाल्याची आवक होते.
बाजारपेठेत घेवड्याची व वालाच्या शेंगांची आवक गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली आहे. त्यामुळे या भाज्यांचे दर थोडेसे महागले आहेत. घेवडा तब्बल 40 रुपये प्रतिकिलोने, तर वालाच्या शेंगा 10 रुपये प्रतिकिलोने महागला आहे.

वांगी प्रतिकिलो 10 रुपयांनी, काकडी प्रतिकिलो 10 रुपयांनी, दोडके प्रतिकिलो 5 रुपयांनी, शेवग्याच्या शेंगा प्रतिकिलो 20 रुपयांनी, सिमला मिरची प्रतिकिलो 10 रुपयांनी, मुळा प्रतिकिलो 5 रुपयांनी, कांदा पात प्रतिकिलो 5 रुपयांनी, टोमॅटो प्रतिकिलो 2 रुपयांनी, तर बटाटाही पाच रुपयांनी महागले आहेत.

फ्लॉवर प्रतिकिलो 10 रुपयांनी, कारले प्रतिकिलो 10 रुपयांनी, वाटाणा प्रतिकिलो 20 रुपयांनी, हिरवी मिरची प्रतिकिलो 10 रुपयांनी, कोथिंबीर जुडीमागे 5 रुपयांनी, पालक जुडीमागे 4 रुपयांनी, मेथी जुडीमागे 3 रुपयांनी, करडई जुडीमागे 2 रुपयांनी, आंबट चुका जुडीमागे 5 रुपयांनी, तर अंबाडी भाजी जुडीमागे 2 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आवक वाढल्यामुळे पालेभाज्यांचे दर उतरले
बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचे भाव आता नगरकरांच्या आवाक्यात आले आहेत. परंतु, अद्याप आवक मंदावलेली असल्यामुळे आंबट चुका अजूनही थोडी महागच आहे. लिंबाचे भाव दहा दिवसांपूर्वी 120 रुपये प्रतिकिलो होते. आता थोड्याफार प्रमाणात आवक वाढल्यामुळे लिंबू 48 रुपये किलोवर आले आहे. शेवग्याच्या शेंगांचे भाव मध्यंतरी उतरले होते. आता पुन्हा ते 20 रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत.’’ बाळू तरोटे, भाजीविक्रेता, नगर.