आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venality Junior Engineer,Latest News In Divya Marathi

महावितरणचा लाचखोर कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नवीन रोहित्र (डीपी) बसवण्याची फाइल मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना शेवगाव येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी शेवगावच्या महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
विश्वास नानासाहेब यादव (शेवगाव) असे पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. जावेद झुंबर शेख (दहीफळ, ताजनापूर) व इतर शेतकर्‍यांनी यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तक्रारदार शेख यांनी नवीन रोहित्र बसवून देण्यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला होता. नवीन रोहित्र बसवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यासाठी यादवने शेख यांना पाच हजारांची मागणी केली. शेख यांनी यासंदर्भात येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. लाचलुचपतच्या पथकाने शुक्रवारी दुपारी शेवगाव येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचला. शेख यांच्याकडून पाच हजारांची लाच घेतला यादवला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. एस. जाधवांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अशोक देवरे, निरीक्षक राजेंद्र माळी, विजय मुर्तडक, कर्मचारी कल्याण गाडे, वसंत वाव्हळ, नितीन दराडे, राजेंद्र सावंत, प्रमोद जरे, रवींद्र पांडे, अंबादास हुलगे यांनी ही कारवाई केली. तक्रारीसाठी 9923176042, 0241-2423677 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.