आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचोली गुरव हत्याकांड: पत्नी अाणि मुलांच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळेगाव दिघे - पत्नी व मुलांच्या खूनप्रकरणी ज्ञानदेव ऊर्फ ज्ञानेश्वर जगन्नाथ सोनवणे यास संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शर्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
 
चिंचोली गुरव येथील ज्ञानदेवने १३ फेब्रुवारी २०१४ रोजी पत्नी अलका (वय ३५), मुलगा बाबासाई (वय ३), मुलगी अपेक्षा (वय ४़ यांना विषारी औषध पाजून गळा आवळून जीवे ठार मारले. गाय घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणल्याने पत्नीवर संशय घेत घरातच हे खून करण्यात आले. 
 
सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. धारबळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शर्मा यांच्यासमोर झाली. एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायाधीश शर्मा यांनी ज्ञानदेवला सश्रम आजीवन कारावास, पाच हजार दंड दंड भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. 
बातम्या आणखी आहेत...