आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेच्या युगात करिअरच्या अनेक संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - यशसंपादन करण्यासाठी विशेष गोष्टीची गरज लागत नाही. ध्येय, जिदद, चिकाटी, इच्छाशक्ती असली, तर यशाचे शिखर गाठता येते. स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी व्यवस्थापन, सामाजिक, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्यूटर अशा अनेक क्षेत्रात संधी आहेत, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.

नगरसेवक अनिल बोरुडे यांनी आयोजित केलेल्या प्रभाग १३ मधील गुणवंत व्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात कळमकर बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक बोरुड यांच्यासह अशोक नवले, प्रा. सुखदेव मुरूमकर, गोरुख बोरुडे, यदुनाथ जोशी, प्रदिप बोरुडे आदी उपस्थित होते. बोरुडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही १० वी १२ परीक्षेत यश मिळवणा व्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. यावेळी कळमकर म्हणाले, आई-वडिलांच्या संस्कारासह गुरूजनांचे संस्कारही महत्त्वाचे असतात. व्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श व्यक्तींचे नाव ठेवून जीवनाची वाटचाल करायला हवी, तसेच शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. १० वी १२ वीनंतर व्यार्थ्यांना पुढील शिक्षण क्षेत्रातील विविध करिअरबाबत फारशी माहिती नसते. पालकांनी त्यांची अभिरुची ओळखूनच त्यांना करिअर करू दिले पाहिजे. नगरसेवक बोरुडे हे आपल्या प्रभागाला परिवाराप्रमाणे सांभाळतात. त्यामुळे त्यांचा प्रभाग आज आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जात असल्याचे कळमकर म्हणाले.प्रभाग १३ मधील गुणवंत व्यार्थ्यांचा सत्कार महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक अनिल बोरुडे पालक उपस्थित होते.

शाबासकीची थाप हवीच
गेल्यादहा वर्षांपासून प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन विकासकामे केली. प्रभागातील १७० व्यार्थ्यांनी १० वी, १२ वी परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच प्रभागातील गुणवंत व्याथ्यांचा आम्ही दरवर्षी सत्कार समारंभ आयोजित करतो. अनिल बोरुडे, नगरसेवक
विधायक
बातम्या आणखी आहेत...