आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon Tirupati shirdi Chennai Express Will Be Start

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरुपती, शिर्डीसाठी लवकरच चेन्नई एक्स्प्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- तिरुपती बालाजी व शिर्डीच्या श्रीसाई भक्तांसाठी नगरसूल ते चेन्नईदरम्यान लवकरच चेन्नई एक्स्प्रेस सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावरून चेन्नई एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड व आपण रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे व राज्यमंत्री कोटला जयसूर्यप्रकाश रेड्डी यांना भेटून केली होती. आता ही साप्ताहिक रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. दर सोमवारी दुपारी 1 वाजता नगरसूल रेल्वेस्थानकावरून चेन्नई एक्स्प्रेस निघेल. मंगळवारी दुपारी 1.30 वाजता ही गाडी रेणीगुंठा, तर दुपारी 4.15 वाजता चेन्नई येथे पोहोचेल. रविवारी ही गाडी चेन्नईहून सुटेल. सकाळी 11.40 वाजता ही गाडी रेणीगुंठा येथे येईल, तर सोमवारी 11.55 वाजता ती नगरसूलला पोहोचेल. औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद, काचीगुडा, गुट्टी, रेणीगुंठा येथे गाडीला थांबा असेल.

कोपरगाव, शिर्डी व राहाता येथील प्रवासी नगरसूल, तर श्रीरामपूर, नेवासे, राहुरी व गंगापूर येथील प्रवाशांना औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास करणे सोयीचे होईल, असे खासदार वाकचौरे यांनी सांगितले. साईनगर ते भुवनेश्वर दरम्यान पुरी साप्ताहिक एक्स्प्रेस नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

नगर, औरंगाबादसह तीन जिल्ह्यांना फायदा
नगरसूल-चेन्नईदरम्यान नव्याने सुरू होणा-या या चेन्नई एक्स्प्रेसचा नगरसह मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यांतील प्रवाशांना फायदा होणार आहे. साप्ताहिक असलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमुळे थेट शिर्डी व तिरुपती बालाजीला जाण्यासाठी भाविकांची सोय झाली आहे.