आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शनी\'ला नव्हे, \'शिंगणापूर\'ला महिलांचे वावडे, शनीसाधिका म्हणाल्या, हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे, असा निर्वाळा हायकोर्टाने काही महिन्यांपूर्वी केला होता.  पूर्वी महिलांना शनीच्या मूर्तीजवळ किंवा चौथऱ्यावर जाऊ नये, असे बंधन घालण्यात आले होते. पण,  प्रत्यक्षात शनीला महिलांचे वावडे नाही, किंवा धर्मात कुठेही तसा काही उल्लेख नाही. हा सर्व गैरसमज महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर येथून पसरवण्यात आलेल्या ठपका शनि साधिका डॉ. विभाश्री दीदी यांनी केला आहे.

गुरुवारी (25 मे) शनैश्वर जयंती आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विभाश्री यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना विविध पौराणिक मुद्द्यावर प्रकाश टाकला. डॉ. विभाश्री म्हणाल्या, मी संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी शनीची पूजा आणि आराधना करते. मला कधीही कोणत्याही ठिकाणी महिला असल्यामुळे वेगळी वर्तणूक मिळाली नाही. हा प्रकार मी सर्वात आधी महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर येथेच पाहिला. याच ठिकाणी महिलांना अशाप्रकारे शनीच्या दर्शनापासून दूर ठेवले जाते.

देशातील महत्त्वाचे मंदिर असल्याने पडला प्रघात..
शनी शिंगणापूर येथील शनिमंदर हे देशातील मह्त्त्वाच्या तीर्थस्थळांपैकी एक आहे. शनीच्या तीर्थस्थळांमध्ये तर या ठिकाणीचे नाव आघाडीवर आहे. याठिकाणी प्रत्यक्ष शनी महाराजांचे वास्तव्य असल्याची शनी भक्तांची मान्यता आहे. त्यामुळेच याठिकाणी असलेल्या चालीरिती, परंपरा, रुढी यांनाही आपोआपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यातूनच महिलांविषयीचा हा गैरसमज पसरला, असल्याचे डॉ. विभाश्री यावेळी बोलताना म्हणाल्या.

सोयीसाठी केला असावा नियम..
पूर्वीच्या काळी मंदिरांमध्ये त्याठिकाणी कामाची व्यवस्था लावण्यासाठी त्या मंदिराच्या सोयीनुसार काही नियम केले जायचे. त्याकाळी महिलांना फारसे महत्त्व दिले जात नसायचे. व्यवहारांमध्ये किंवा धार्मिक बाबींमध्येही महिलांना फारसे स्थान नसायचे. त्यामुळे मंदिराच्या कामाशी संबंधित जी पदे किंवा समित्या असतील, त्यात महिला नसायच्या. हीच पद्धत हळू हळू रूढ होऊन त्यातून शनी मंदिरामध्येही महिलांना जाण्यास बंदी घालण्यात आली असावी अशी शक्यता विभाश्री दीदी यांनी व्यक्त केली. 

शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, कोण आहेत डॉ. विभाश्री दीदी..
बातम्या आणखी आहेत...