आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चात गाजले सोनईतील शेतकऱ्याच्या मुलीचेे भाषण, व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राजकारणाशी संबंध नसलेल्या सोनई येथील शेतकरी कुटुंबातील राणी माधव दरंदले हिने मुंबईतील मराठा मोर्चासमोर केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. राणीने लाखोंच्या जनसमुदायासमोर मराठा समाजाची बाजू परखडपणे मांडली. राज्यभरातून आलेल्या मोर्चेकऱ्यांनी तिच्या भाषणाचे कौतुक केले. राणीच्या भाषणाने नगर जिल्ह्याचे नाव राज्यभर पोहोचले. 
 
मुंबईतील आझाद मैदानावर जमलेल्या लाखो मोर्चेकऱ्यांच्या मागण्या राणीने आपल्या भाषणात मांडल्या. नगर शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयातून तिने बीएस्सी पूर्ण केले. नगरमध्ये झालेल्या मराठा मोर्चातही राणीने भाषण केले होते. मात्र, मुंबईतील मोर्चापुढे भाषण करण्याची संधी मिळेल, याची कल्पनाही तिला नव्हती. भाषणासाठी निवड झाल्याचे एक दिवस आधी तिला सांगण्यात आले. कोणतीही तयारी करता राणीने केलेले भाषण सर्वांच्याच हृदयाला भिडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार, महिलांना ५० टक्के आरक्षण असले, तरी शंभर टक्के संरक्षण कधी मिळणार, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी कधी देणार या मराठा समाजाच्या मागण्या तिने तळमळीने मांडल्या. सरकारच्या कार्यपध्दतीमुळे शेतकरी आत्महत्या करत असून त्या थांबतील अशी व्यवस्था निर्माण करा, असे आवाहन तिने सरकारला केले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, समाजपरिवर्तन करण्याचा प्रयत्न...
बातम्या आणखी आहेत...