आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभ्रमामुळे इच्छुकांचा खर्चासाठी हात आखडता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीची प्रक्रियेला शनिवारपासून (२० सप्टेंबर) उमेदवारी अर्ज दाखल होण्याने सुरुवात होणार आहे. मात्र अद्याप कुठल्याही प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर न केल्याने सध्या तरी सर्वच पक्ष व इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीबाबत संभ्रम आहे. अनेकांनी निवडणुकीची तयारी केली आहे. पण अद्याप नाव जाहीर न झाल्याने तसेच ऐनवेळी नाव रद्द होऊ शकते, या भीतीने इच्छुकांनीही खर्चासाठी आखडता हात घेतला आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाली नसल्याने आणि पितृपक्ष सुरू असल्याने पहिल्या दिवशी अर्ज विक्री होईल, पण उमेदवारी अर्ज दाखल होणे अशक्य आहे.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात चांगलेच तापू लागले आहे. जिल्‍ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत होणाऱ्या या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवार निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे. जिल्‍ह्याच्या बारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शविसेना, भाजप, मनसे या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीसाठी पक्षांची तयारी झाली असली, इच्छुक उमेदवार मात्र पक्ष प्रमुखांच्या आदेशाची प्रतीक्षेत आहेत. आघाडी व महायुतीमध्ये सुरू असलेला जागा वाटपाचा घोळ संपला नसल्याने इच्छुकांमधील संभ्रमात आणखी भर पडली आहे. काही विद्यमान आमदारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या आशेने आचारसंहिता लागण्यापूर्वीपासूनच प्रचार सुरू केला आहे.

उत्तरेत अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे हे सहा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील कोपरगाव वगळता अन्य मतदारसंघ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे बालेकिल्‍ले आहेत. कोपरगाव हा शविसेनेचा मतदारसंघ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेिकल्ल्याला िखंडार पाडण्याची भाजपने तयारी केली आहे. मात्र, अनेक मतदारसंघांत प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपची गोची होण्याची चिन्‍हे आहेत. अकोले, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर व नेवासे या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा जुन्याच आमदारांना पुढे करण्याची तयारी केली आहे. अद्याप त्यांचीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे मतदारसंघामध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे. ज्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यांना ऐनवेळी नाव रद्द झाले, तर या भीतीने त्यांनी खर्चासाठी आखडता हात घेतला आहे. पितृपक्षामुळे अनेकांनी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलून २५ सप्टेंबरला घटस्थापनेचा मुहूर्त साधून अर्ज दाखल करणार आहेत.
शेवटचे २ दविस उडणार झुंबड
इच्छुक उमेदवारांनी पितृपक्षाचा धसका घेतला आहे. उमेदवारी दोन-तीन दविसांत जाहीर होतील. पितृपक्षात प्रचाराचा नारळ कसा फोडायचा किंवा अर्ज कसा भरायचा या चिंतेत इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दविसांत म्हणजे २६ आणि २७ सप्टेंबरला तहसील कार्यालयांवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. १५ ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य हे अपशकुन समजले जाते. त्यामुळे या काळात प्रचाराचा नारळ कसा फोडायचा ? हा प्रश्न इच्छुकांसमोर आहे.
आमदारांना प्रतीक्षा घोषणेची
श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. मात्र, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ हा आता भाजपकडे जाणार आहे. राहुरी, कोपरगाव, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड हे पाच मतदारसंघ शविसेना-भाजपकडे आहेत. या मतदारसंघात शविसेना-भाजप विद्यमानांनाच पुन्हा संधी देणार आहेत. मात्र, अजून तशी अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे शविसेना-भाजपचे सर्वच विद्यमान आमदार सध्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहे.

तहसीलमध्ये स्वीकारणार अर्ज
विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (२० सप्टेंबर) अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. शनिवारपासूनच उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. जिल्‍ह्यातील अकोले, संगमनेर, शिडी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदे व कर्जत-जामखेड या मतदारसंघातील तहसील कार्यालयांमध्येच उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सर्व मतदारसंघात बारा निवडणूक िनर्णय अधिकारी व बारा सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.