आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय शिवतारेंचे अजब वक्‍तव्‍य, म्‍हणाले \'सैराट\'ने तरुण पिढीचंं वाटोळंं केलं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- नागराज मंजुळे दिग्‍दर्शित सैराट या सिनेमाने रसिकांमध्‍ये वेगळे स्‍थान निर्माण केले. भक्‍कम कमाई करणा-या या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सैराटबाबत अजब वक्‍तव्‍य केले आहे. सैराट सिनेमाने तरुण पिढीचे वाटोळं केलं, असे शिवतारे यांनी म्‍हटले आहे. हिवरेबाजार येथे त्‍यांनी हे मत व्‍यक्‍त केले आहे. जलसंधारणाची पाहणी करण्‍यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिवरे बाजारला भेट दिली.

शिवतारे यांचा सल्‍ला..
चांगलं शिका, शिक्षण पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभे राहा, मग सैराट व्हा, असा सल्ला शिवतारे यांनी तरुणांना दिला. निर्माते दिग्‍दर्शकांवरही त्‍यांनी नेम साधला ते म्‍हणाले, अल्पावधित जास्त पैसा कमावण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक सैराटसारखे चित्रपट काढतात.
नितेश राणे यांनीही केली टीका..
सैराटच्‍या यशाबद्दल कौतुक आणि नाराजीचा सूरही ऐकू येत आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही काही दिवसांपूर्वी सैराट सिनेमाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. काही दिवसांपूर्वी सोलापुरात मराठा आरक्षण एल्गार मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच 'सैराट' सिनेमावर त्यांनी टीका केली होती.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, काय म्हणाले होते, नितेश राणे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...