आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्तीसाठी विखे-थोरात रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एरवीएकमेकांवर कुरघोड्या करून परस्परांना शह देण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस अंतर्गत विरोधक सरकारविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने गुरुवारी पहलि्यांदाच खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले.
शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कर्जमुक्ती खेचून आणण्याचा संकल्प करतानाच या दोन्ही नेत्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

राज्यातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, तसेच दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे खत पुरवावे, या मागणीसाठी जलि्हा काँग्रेसच्या वतीने विखे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. नियोजित वेळेपेक्षा एक तास वलिंबाने हा मोर्चा जलि्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. विखे यांच्यासह थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे डॉ. सुधीर तांबे, जलि्हाध्यक्ष जयंत ससाणे, जलि्हा परिषद उपाध्यक्ष अण्णा शेलार, उपमहापौर सुवर्णा कोतकर, माजी खासदार दादा शेळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे जलि्हाध्यक्ष, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. विखे, थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा जलि्हाधिकारी कार्यालयासमोर आला.

आंदोलकांसमोर बोलताना विखे म्हणाले, घोषणांचा पाऊस स्वप्नांची मालिका दाखवत सर्वसामान्यांची दिशाभूल करून राज्यात महायुतीचे सरकार सत्तारुढ झाले. आश्वासनाप्रमाणे चांगले दिवस येणार, सात-बारा कोरा होईल या अपेक्षेत असलेल्या नागरिकांच्या पदरी शेवटी निराशाच पडली. आश्वासनपूर्ती दूरच असून उलट शेतक-यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मुदत संपूनही शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठण होत नाही. पीकविम्याच्या दरातही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. वर्षाच्या आतच सरकारविरोधातील असंतोष पुढे येत आहे. भंडारा, गोंदिया जलि्हा परिषदेच्या निकालातून हा असंतोष बाहेर पडला. या सरकारने शेतक-यांची उपेक्षा चालवली आहे. सरकारचा कोणताही आधार नसल्याची भावना शेतक-यांमध्ये बळावली असून मंत्र्यांची कृतीही या भावनेला बळ देणारी ठरत आहे.

विखे म्हणाले, शेतक-यांना वा-यावर सोडून गोवंश हत्याबंदी करण्यात आली. भाकड जनावरे सांभाळताना शेतक-यांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. या भाकड जनावरांचा मोर्चा विधानसभेवर नेण्याची आवश्यकता आहे. सलग तिस-या वर्षी जलि्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. काळ्या बाजारातील बियाणे घेऊन मेटाकुटीला आलेल्या शेतक-याला आता दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे खते पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद आहे. निर्णायकी झालेल्या सरकारवर कोणाचाही अंकुश नाही. भ्रष्टाचार बोकाळला असून पुन्हा संधी मिळणार नसल्याची खात्री असल्याने मिळेल तिथे हात मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेत असलेल्या असंतोषाची सरकारला जबर किंमत मोजावी लागेल, असे विखे यावेळी बोलताना म्हणाले.

यासरकारला काहीच कळत नाही : थोरात
थोरातम्हणाले, खोटे स्वप्न, खोटे आरोप जनतेची दिशाभूल करून महायुतीचे सरकार सत्तेत आले. आता जनतेला त्यांचे खरे स्वरूप लक्षात येत असून ही परिस्थिती जनतेसमोर अधिक ठळकपणे घेऊन जाण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. बालिशपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सध्याच्या राज्य मंत्रिमंडळाकडे बघितले पाहजिे. कुणालाच कशाचा मेळ नसल्याचे चित्र आहे. दुबार पेरणीची वेळ आल्याचीही माहितीही सरकारला नाही. शेतकरी विरोधी नसल्याचा दावा करणा-या या सरकारला मुळात शेतक-यांचे प्रश्नच समजत नाहीत. त्यांच्या प्रश्नांची जाणही सरकारला नाही. ३० जूनला दुष्काळी उपाययोजनांची मुदत संपते, याची माहितीच सरकारला नव्हती. या हलगर्जीपणामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या जनतेला त्रास सहन करावा लागला. विरोधी पक्ष जलि्हाधिका-यांनी सांगितल्यानंतर सरकारला जाग आली दुष्काळी उपाययोजनांना मुदतवाढ मिळाली. कांदा, दूध, साखर मातीमोल दराने विकली जात असताना सरकार हातावर हात ठेवून ढिम्मपणे पहात आहे. कृषी आधारित अर्थव्यवस्था असल्याने देश टिकून आहे. ही व्यवस्था मोडली, तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल. शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय सध्या नाही. ही कर्जमाफी खेचून आणण्याची जबाबदारी काँग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांवर आली असून कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी वसूल करू, असा इशारा थोरात यांनी दलिा.

"स्टिंग'बाबत मौन
पावसाळीअधिवेशनात राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांविरूद्ध केलेले स्टिंग जाहीर करणार असल्याचा खळबळजनक दावा विखे यांनी पंधरा दिवसांपूर्वी नगरमध्ये केला होता. संबंधित मंत्र्यांविरूद्ध कार्यकर्त्यांनी केलेले स्टिंग जाहीर करून सरकारचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर मांडणार असल्याचे सांगून विखे यांनी खळबळ उडवून दिली होती. मात्र, गुरुवारी त्यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता आताच या विषयावर काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

थकीत एफआरपीला सरकार जबाबदार
साखरेलाप्रतिक्विंटल ३५०० रुपयांचा दर मिळाला, तरच उसाला एफआरपीनुसार (किमान किफायतशीर दर) भाव देणे शक्य होते. मात्र, सध्या १९५० प्रतिक्विंटल दराने साखर विकली जात आहे. सहकारमंत्री, मुख्यमंत्री थेट पंतप्रधानांपर्यंत हा विषय गेला. मात्र, तातडीच्या उपाययोजना झाल्या नाहीत. दोन हजार कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून तीन महिने उलटले, तरी एक रुपयाचेही कर्ज कारखान्यांना मिळाले नाही. थकीत एफआरपीला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचे थोरात यांनी सागितले.

राज्यातील संकटग्रस्ट शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये ४० टक्के वाढ
केंद्रराज्यात सध्या शेतक-यांचा कळवळा असल्याचे ढोंग करणारे सरकार सत्तारूढ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेश दौरे करण्यासाठी भरपूर वेळ आहे. मात्र, विदर्भात आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाही. महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे यांनी यावेळी केला.

चिक्कीचा उल्लेख नाही
मातीमिश्रितराजगिरा चिक्कीचे प्रकरण उघडकीस आणणा-या नगर जलि्ह्यात मोर्चा काढूनही काँग्रेसच्या एकाही वक्त्याने चिक्की घोटाळ्याचा साधा उल्लेखही त्यांच्या भाषणात केला नाही. चिक्की घोटाळ्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची चांगली संधी असतानाही काँग्रेसने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले. विखे यांना हा घोटाळा सरकारी प्रयोगशाळांनी दलिेली क्लिन चिट यासंदर्भात विचारले असता त्यांनी बघावे लागेल, माहिती घेतो, असे मोघम उत्तर देत वेळ मारून नेली.

राज्यातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जलि्हाधिकारी कार्यालयावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला.