आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे महाविद्यालयात रोबो व्हिजन कार्यशाळा उत्साहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विळद घाटातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबो व्हिजन २०१४ कार्यशाळा उत्साहात पार पडली.
महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रोबोटिक्स, इमेज प्रोसेसिंग व मॅटलॅब याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
क्वाल्डन टेक्नॉलॉजी, पुणे येथील मितुल बिजलानी, हरेकृष्ण सिंग, अनुप चौधरी यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. उद्धाटन प्राचार्य डॉ. एच. एन. कुदळ, रजिस्ट्रार एस. एम. मगर आदींच्या उपस्थित झाले. या कार्यशाळेचा उपयोग करुन ज्ञानात भर घालावी, असे आवाहन प्राचार्यांनी यावेळी केले. अभियांत्रीकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालय सातत्याने करते. यापुढेही अशा कार्यशाळा घेणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनच्या विभागप्रमुख एस. एस. मगर यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सी. के. कलावडे यांच्यासह या विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.