आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाकरेंच्या रोपट्यावर मुख्यमंत्र्यांनी घातलेली माती इशाराच : विखे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- उद्धव ठाकरेंनी लावलेल्या रोपट्यावर मुख्यमंत्री माती घालतात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही देतात, हे केवळ वरकरणी असून, प्रत्यक्षात एकमेकांना संपवण्यासाठी दिलेले ते सूचक इशारे असल्याचे मत विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

भाजप-शिवसेनेच्या वादावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, शिवसेनेला मूठमाती देण्याचे भाजपचे प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी रोपट्यावर घातलेली माती हे त्याचेच निदर्शक आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासंदर्भात केलेल्या विधानाचा छुपा अर्थ आम्ही भाजपला खांदा देणार आहोत, असा आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांना संपवायला निघाले असून परस्परांच्या अस्तित्वावर घाला घालण्यास निघालेल्या दोन पक्षांच्या सरकारकडून जनतेला दिलासा मिळणे शक्यच नाही. साहजिकच आता आपले अपयश झाकण्यासाठी भाजप-शिवसेना सरकारची धडपड सुरू अाहे. त्यासाठी जनतेचे लक्ष इतरत्र वळवले जात अाहे. शासकीय कार्यक्रमांनाही इव्हेंटचे रूप देऊन सरकार कार्यक्षम असल्याचा आभास निर्माण केला जातो, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...