आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसाठीच्या दारणा धरणातील पाण्यावर नाशिककरांचा डल्ला- विखे-पाटील खळवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - कोपरगाव आणि राहाता शहरासाठी दारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनावर निफाड आणि नाशिक भागातील लोकांनी डल्ला मारला. ही बाब उघड झाल्याने या भागात संतापाची लाट उसळली आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी तातडीची बैठक घेऊन पाटबंधारे अधिकाºयांना फैलावर घेतले.

पाटबंधारे खात्याच्या निष्काळजीपणामुळे या आवर्तनाचे केवळ 20 टक्केच पाणी लाभक्षेत्रात पोहोचले. या पाण्यातून कोपरगाव आणि राहाता तालुक्यांतील साठवण तलाव जेमतेम 35 टक्क्यांपर्यंत भरले. नजीकच्या काळात शिर्डीत रामनवमी आणि पाडवा उत्सवानिमित्त होणाºया गर्दीला पिण्याचे पाणी कसे पुरवावे, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार दारणा धरणातून सोडलेले हे पाणी नांदूर-मध्यमेश्वर प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी पाटबंधारे खात्याने काळजी घेतली नाही. आवर्तनकाळात नदीकाठी भारनियमन करण्याच्या सूचना महावितरणने पाळल्या नाहीत. पाटबंधारे अधिकाºयांनी त्यासाठी पाठपुरावा केला नाही. नाशिक जिल्ह्यातील धनदांडग्यांनी मोटारी लावून नगरसाठी सोडलेल्या पाण्याचा बेसुमार उपसा केला. विखे यांनी या प्रकाराची दखल घेतली. विभागीय आयुक्त, नगरचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी पाटबंधारे आणि महावितरणच्या अधिकाºयांची तातडीची बैठक शिर्डी येथे घेतली. राज्य सरकारने पिण्यासाठी पाणी देण्याची भूमिका घेतली असताना पाटबंधारे अधिकाºयांनी त्यात कसूर केली, अशा शब्दांत विखेंनी फटकारले. आगामी काळात शिर्डी, राहाता आणि कोपरगाव भागासाठी जी आवर्तने सोडण्यात येणार आहेत, त्याचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले. हा आराखडा घेऊन गुरुवारी मंत्रालयात बैठकीसाठी यावे, असे विखेंनी सांगितले.