आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण लागू न झाल्यास गंभीर परिणाम, विरोधी पक्षनेते विखे यांचा सरकारला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होऊन ते लागू झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला.
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले, उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दिलेली नवीन तारीख ही सरकारसाठी अंतिम मुदत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षणाची घोषणा झाली पाहिजे. तसे झाल्यास समाजाच्या असंतोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. मराठा आरक्षणाची प्रकिया पूर्ण करण्यास सरकारकडून अपेक्षित गतिमानता दिसून येत नसल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले.

शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती, ईबीसी मर्यादा शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या योजनांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले, या सरकारने यापूर्वीही अनेकदा लोकप्रिय घोषणा केल्या आहेत, परंतु त्यातील अनेक घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिल्या. मंत्रिमंडळाने आज जाहीर केलेल्या योजना केवळ कागदावरच राहणार नाहीत; तर त्याची तातडीने प्रभावी अंमलबजावणी होईल, यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...