आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांचे स्टिंग उघड करणार : विखे पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांच्या कारभाराचे स्टिंग ऑपरेशन आपण केले असून येत्या पावसाळी अधिवेशनात ते उघड करणार आहोत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी केला.

दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे म्हणाले, २०६ कोटींच्या खरेदी प्रकरणाच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. तसेच वस्तूंच्या खरेदीला मंजुरी देणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विखे यांनी केली.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा सरकारचा निर्णय राजकीय असल्याचा आरोप विखे यांनी केला. एकाच जिल्ह्याऐवजी संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे आवश्यक होते. प्रवरा कारखान्याला १९७८ मध्ये मद्यनिर्मितीचा परवाना मिळाला. या मद्यविक्रीतून सरकारला १८५ कोटी रुपयांचा कर देतो. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कारखान्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...