आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाडसी ग्रामस्थांनी दरोडेखोराला पकडले, कोपरगावमधील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - कोपरगाव बेट येथील घरावर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. आरडाओरडा झाल्यानंतर धाडसी ग्रामस्थांनी एका दरोडेखोराला पकडून बेदम चोप दिला. इतर दरोडेखोरांनी गोळीबार केला आणि पळून गेले. दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जण जखमी झाले. यात दागिने मिळून 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवला.
चालक असलेले परसराम रघुनाथ गिते (45) यांच्या घरात मध्यरात्री 6 दरोडेखोरांनी दरवाजे तोडून हल्ला चढवला. जागे झालेल्या घरातील मुलांनी दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी पिस्तूल, तलवार व चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व पैसे घेतले. महिला, मुलांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावले. दरोडेखोरांनी मंगलाबाई परसराम गिते, मोनाली योगेश गिते, कौशाबाई गिते यांचे दागिने, रवींद्र गिते यांचे पैसे लुटले. यात फिर्यादी परसराम रघुनाथ गिते, वैभव गिते, योगेश गिते, विलास तुकाराम गोंदकर जखमी झाले.
तलवार हस्तगत
पोलिसांना घटनास्थळी एक तलवार सापडल्याची माहिती आहे. अधिकार्‍यांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. इन्स्पेक्टर मधुकर औटे तपास करत आहेत.
मुसक्या आवळल्या
लहू जालिंदर पवार (सलबतपूर, ता. नेवासे) यास पकडून ग्रामस्थांनी मारहाण केली व पोलिसांच्या हवाली केले. साथीदाराला सोडवण्यासाठी अन्य दरोडेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.